Jump to content

लुईझियाना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
The printable version is no longer supported and may have rendering errors. Please update your browser bookmarks and please use the default browser print function instead.
लुईझियाना
Louisiana
État de Louisiane
Flag of the United States अमेरिका देशाचे राज्य
राज्याचा ध्वज राज्याचे राज्यचिन्ह
ध्वज चिन्ह
टोपणनाव: बायो स्टेट (Bayou State)
ब्रीदवाक्य: Union, Justice and Confidence
Union, justice, et confiance
(फ्रेंच)
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा

अमेरिकेच्या नकाशावर चे स्थान
अधिकृत भाषा कोणतीही नाही
इतर भाषा इंग्लिश, फ्रेंच
राजधानी बॅटन रूज
मोठे शहर न्यू ऑर्लिन्स
क्षेत्रफळ  अमेरिकेत ३१वा क्रमांक
 - एकूण १,३५,३८२ किमी² 
  - रुंदी २१० किमी 
  - लांबी ६१० किमी 
 - % पाणी १५
लोकसंख्या  अमेरिकेत २५वा क्रमांक
 - एकूण ४५,३३,३७२ (२०१० सालच्या गणनेनुसार)
 - लोकसंख्या घनता ४०.७/किमी² (अमेरिकेत २६वा क्रमांक)
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश ३० एप्रिल १८१२ (१८वा क्रमांक)
गव्हर्नर बॉबी जिंदाल
संक्षेप   US-LA
संकेतस्थळ www.louisiana.gov

लुईझियाना (इंग्लिश: Louisiana; फ्रेंच: État de Louisiane; En-us-Louisiana.ogg उच्चार ) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या दक्षिण भागात वसलेले लुईझियाना क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ३१वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने २५व्या क्रमांकाचे राज्य आहे.

लुईझियानाच्या दक्षिणेला मेक्सिकोचे आखात, पश्चिमेला टेक्सास, उत्तरेला आर्कान्सा तर पूर्वेला मिसिसिपी ही राज्ये आहेत. बॅटन रूज ही लुईझियानाची राजधानी तर न्यू ऑर्लिन्स हे सर्वात मोठे शहर आहे. मिसिसिपी ही अमेरिकेमधील सर्वात मोठी नदी राज्याच्या मधून वाहते. राज्याचा दक्षिणेकडील भाग दलदलीच्या स्वरूपाचा आहे.

मासेमारी व शेती हे दोन येथील सर्वात मोठे उद्योग आहेत. दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत लुईझियानाचा देशात ४१वा क्रमांक लागतो. येथील मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असणाऱ्या जलमार्गांमुळे सागरि वाहतूकीचे लुईझियाना हे अमेरिकेमधील सर्वात मोठे केंद्र आहे. मिसिसिपी नदीवर बांधलेले दक्षिण लुईझियाना बंदर हे पश्चिम गोलार्धातील सर्वात मोठे बंदर आहे.

अमेरिकन संघात सामील होण्यापूर्वी लुईझियाना ही एक फ्रेंच वसाहत होती. त्यामुळे येथील संस्कृतीवर फ्रेंच पगडा जाणवतो. आज्च्या घडीला लुईझियाना राज्यातील ३२.१ टक्के रहिवासी आफ्रिकन अमेरिकन वंशाचे आहेत. बॉबी जिंदाल हे भारतीय वंशाचे राजकारणी लुईझियानाच्या राज्यपाल पदावर आहेत.


मोठी शहरे


गॅलरी

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: