Jump to content

बालिका दिन (महाराष्ट्र)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
KiranBOT II (चर्चा | योगदान)द्वारा १४:४४, ३ जानेवारी २०२३चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)
१९९८ मधील टपाल तिकीटावर सावित्रीबाई फुले

बालिका दिवस हा महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त साजरा केला जाणारा एक दिवस आहे. या दिवशी महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. महिला शिक्षण दिन म्हणून देखील हा दिवस साजरा होतो. ३ जानेवारी या सावित्रीबाईंच्या जन्मदिनानिमित्त बालिका दिवस साजरा केला जातो.[]  

महाराष्ट्र शासनाकडून १९५५ पासून हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. सावित्रीबाईंना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते. आपले पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते. सावित्रीबाई आणि त्यांचे पती यांनी इ.स. १८४८ मध्ये पुणे येथील भिडेवाड्यात मुलींच्या शाळेची स्थापना केली. ही शाळा देशात स्थापन झालेल्या सुरुवातीच्या शाळांपैकी एक होती.[]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "शिक्षक दिन 2021 : विशेष प्रथम शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले;वाचा". Maharashtra Times. 2022-01-03 रोजी पाहिले.
  2. ^ अमेरिकन मिशनरी सिंथिया फरार यांनी 1829 मध्ये मुंबईत मुलींची शाळा सुरू केली होती. 1847 मध्ये, विद्यार्थी साहित्यिक आणि वैज्ञानिक समाजाने मुंबईच्या गिरगाव परिसरात मुलींसाठी कमलाबाई हायस्कूल सुरू केले. 2016 मध्ये ही शाळा अजूनही सुरू आहे. पेरी चरण सरकार यांनी 1847 मध्ये बारासात या बंगाली शहरात कालीकृष्ण गर्ल्स हायस्कूल नावाची मुलींसाठी शाळा सुरू केली. पारशी समुदाय मुंबईने 1847 मध्ये मुलींसाठी एक शाळा देखील स्थापन केली होती.