Jump to content

संजय दत्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
संजय दत्त
जन्म संजय दत्त
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय

संजय दत्त हा हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अभिनेता आहे. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त यांचा मुलगा आहे. त्यांची आई नर्गिस दत्त देखील हिंदी चित्रपटसृष्टीतील गाजलेली नायिका आहे.

संजय दत्त यांनी आयुष्यात अनेक चढ उतार पाहिले. त्यांचा अभिनेता म्हणून सुरुवात चांगलीच गाजली. परंतु अंमली पदार्थांच्या आहारी गेले व अनेक वर्षे चित्रपट सृष्टीपासून दूर होते. अंमली पदार्थांचे सेवन केल्याने त्यांची तब्येत एकेकाळी फारच खालावली होती. त्यावेळेस सुनिल दत्त यांनी त्याला अमेरिकेत उपचारांसाठी नेले. अंमली पदार्थांचे संजय दत्त यांचे व्यसन उपचारानंतर सुटले व त्यांनी काही काळ अमेरिकेत व्यतीत केला. या काळात त्यांना अमेरिकेतच रहाण्याची व चित्रपट सृष्टीतील प्रसिद्धी पासून दूर रहाण्याचे ठरवले होते. परंतु सुनिल दत्त यांनी आपल्या इच्छेखातर भारतात परतण्याची विनंती केली व त्यास संजय दत्त यांनी होकार दिला.

भारतात परतल्यानंतर काही काळानंतर पुन्हा चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. अनेक हिट चित्रपट दिले. या काळात व्यक्तीक आयुष्यात फेरबदल झाले. तसेच १९९२ च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे तत्कालीन टाडा कायद्यात चांगलेच गोवले गेले.

संजय दत्त यांना २००९ च्या लोकसभा निवडणूकीसाठी समाजवादी पक्षाची उमेदवारी मिळाली. ते लखनौ या मतदार संघातून उमेदवारी लढणार होते. सी.बी.आय ने त्यांच्या मिळालेल्या शिक्षेचा दाखला देत त्यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी केली. ३१ मार्च २००९ रोजी सर्वोच्च न्यायलयाने दिलेल्या निर्णयानुसार त्यांना निवडणुक लढवता येणार नाही.

२१ मार्च २०१३ रोजी भारतीय सर्वोच्च न्यायालयाने १९९३ मुंबई बॉम्बस्फोट खटल्याचा निर्णय देताना बेकायदा शस्त्र बाळगल्याच्या आरोपाखाली संजय दत्त यांना ५ वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

प्रमुख चित्रपट