विजय मर्चंट
विजय मर्चंट | ||||
भारत | ||||
व्यक्तिगत माहिती | ||||
---|---|---|---|---|
पूर्ण नाव | विजयसिंग माधवजी मर्चंट जन्म नावः विजय माधवजी ठाकरसी | |||
जन्म | १२ ऑक्टोबर, १९११ | |||
बॉम्बे (सद्य मुंबई), महाराष्ट्र,भारत | ||||
मृत्यु |
२७ ऑक्टोबर, १९८७ (वय ७६) | |||
बॉम्बे (सद्य मुंबई), महाराष्ट्र, भारत | ||||
विशेषता | फलंदाज | |||
फलंदाजीची पद्धत | उजखोरा | |||
गोलंदाजीची पद्धत | उजव्या हाताने मध्यम | |||
आंतरराष्ट्रीय माहिती | ||||
राष्ट्रीय स्पर्धा माहिती | ||||
वर्ष | संघ | |||
१९२९–१९५१ | मुंबई | |||
कारकिर्दी माहिती | ||||
कसोटी | प्र.श्रे. | |||
सामने | १० | १५० | ||
धावा | ८५९ | १३४७० | ||
फलंदाजीची सरासरी | ४७.७२ | ७१.६४ | ||
शतके/अर्धशतके | ३/३ | ४५/५२ | ||
सर्वोच्च धावसंख्या | १५४ | ३५९* | ||
चेंडू | ५४ | ५०८७ | ||
बळी | – | ६५ | ||
गोलंदाजीची सरासरी | – | ३२.१२ | ||
एका डावात ५ बळी | – | १ | ||
एका सामन्यात १० बळी | – | – | ||
सर्वोत्तम गोलंदाजी | – | ५/७३ | ||
झेल/यष्टीचीत | ७/– | ११५/– | ||
विजयसिंग माधवजी मर्चंट तथा विजय माधवजी ठाकरसी (१२ ऑक्टोबर, इ.स. १९११ - २७ ऑक्टोबर, इ.स. १९८७) हे भारतकडून दहा कसोटी सामने खेळलेले क्रिकेट खेळाडू होते. उजखोरा फलंदाज व उजखोरा मध्यमगती गोलंदाज असलेल्या मर्चंट यांनी इ.स. १९२९ ते इ.स. १९५१ दरम्यान मुंबईसाठी प्रथमश्रेणी सामने खेळले. त्यांची फलंदाजीची सरासरी ७१.६४ ही प्रथमश्रेणी क्रिकेट इतिहासातील डॉन ब्रॅडमननंतरची दुसरी सर्वोच्च सरासरी आहे.
त्यांनी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत दोन इंग्लंड दौरे केले ज्यामधे त्यांनी ४००० पेक्षा जास्ती धावा केल्या. इंग्लिश क्रिकेटपटू सी.बी. फ्राय म्हणाला होता की "Let us paint him white and take him with us to Australia as an opener." त्यांचे भाऊ उदयसुद्धा प्रथमश्रेणी क्रिकेट खेळलेले आहेत.
क्रिकेट व्यतिरिक्त ते ठाकरसी ग्रुपच्या हिंदुस्तान स्पिनिंग व वीविंग मिल्सशी संलग्न होते.
कौटुंबिक माहिती
मर्चंट यांचा जन्म इ.स. १९११ मध्ये मुंबईमध्ये एका श्रीमंत घरात झाला.
भारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
भारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.
|