स्मोलेन्स्क हवाई दुर्घटना
एप्रिल १०, इ.स. २०१० रोजी पोलिश वायुसेनेच्या ३६व्या विशेष विमानवाहतूक रेजिमेंटचे तुपोलेवने बनवलेले तू-१५४ विमान रशियातील स्मोलेन्स्क ओब्लास्टच्या स्मोलेन्स्क शहराजवळील उत्तर स्मोलेन्स्क विमानतळाजवळ कोसळले. या दुर्घटनेतील ९७ मृतांत पोलंडचे राष्ट्राध्यक्ष लेक कझिन्स्की, पोलंडच्या सैन्याचे उच्चाधिकारी, नॅशनल बँक ऑफ पोलंडचे गव्हर्नर, अनेक मंत्री, पोलंडच्या संसदेचे सदस्य, धार्मिक नेते यांचा समावेश होता. ही मंडळी केटिन हत्याकांडाच्या ७०व्या स्मृतिदिनानिमित्त वॉर्सोहून स्मोलेन्स्कला चालली होती.[४]
लेक कझिन्स्कीच्या २००९ ऑस्ट्रेलिया दौऱ्या दरम्यान सिडनी विमानळावर उभे असलेले तुपोलेव्ह टीयू १५४एम (क्र. १०१) | |
अपघात सारांश | |
---|---|
तारीख | एप्रिल १०, २०१०[१] |
प्रकार | अन्वेषणाधीन[१] |
स्थळ |
उत्तर स्मोलेन्स्क विमानतळाच्या धावपट्टीपासून ३०० मीटर अंतरावर[२] 54°49′31.19″N 32°3′10.28″E / 54.8253306°N 32.0528556°E |
प्रवासी | ८९ |
कर्मचारी | ८ |
जखमी | ० |
मृत्यू | ९७ (सगळे)[३] |
बचावले | ० |
विमान प्रकार | तुपोलेव तू-१५४एम |
वाहतूक कंपनी | ३६ एसपीएलटी, पोलिश वायुसेना |
विमानाचा शेपूटक्रमांक | १०१ |
पासून |
फ्रेडरिक चॉपिन विमानतळ, वॉर्सो, पोलंड |
शेवट |
उत्तर स्मोलेन्स्क विमानतळ स्मोलेन्स्क, रशिया |
या दुर्घटनेची कारणे अद्याप समजलेली नाहीत आणि बरीचशी माहिती अटकळींवर आधारित आहे. बातमीसंस्थांच्या अहवालानुसार वैमानिकांने दाट धुक्यात उतरण्याचे चार प्रयत्न केले. स्मोलेन्स्कच्या तळ-नियंत्रकाने(भू-नियंत्रक) (ग्राउंड कंट्रोल) वैमानिकांना तेथे न उतरता मिन्स्क किंवा मॉस्कोला जाण्याचा सल्ला दिल्याचेही अहवाल आहेत. उतरण्याच्या चौथ्या प्रयत्नादरम्यान विमान धावपट्टीपासून साधारण दीड किमीवर ग्लाइडस्लोप (तरंग-उतरण) [मराठी शब्द सुचवा]पेक्षा खूप खाली येऊन झाडांना आदळले व जमिनीवर कोसळले.
विमानातील ८ कर्मचारी आणि ८९ प्रवासी यांच्यासह (एकूण ९७) सगळेजण अपघातात ठार झाले. हा अपघात पोलंडच्या इतिहासातील आणि २०१०मधील विमानअपघातांतील सगळ्यात जास्त घातक अपघात आहे.
अपघात
संपादनपोलंडच्या राष्ट्राध्यक्ष लेक कझिन्स्कीला घेऊन वॉर्सोच्या फ्रेडरिक चॉपिन विमानतळावरून[५] निघालेले तुपोलेव्ह टीयू १५४एम प्रकारचे विमान[६] मॉस्को प्रमाणवेळेनुसार १०:५६ वाजता, (०८:५६ मध्य युरोपीय उन्हाळी प्रमाणवेळ, ०६:५६ यू.टी.सी.),[७] स्मोलेन्स्क, रशियाजवळ कोसळले. कझिन्स्की व इतर मंडळी केटिन हत्याकांडाच्या ७०व्या स्मृतिदिनानिमित्त स्मोलेन्स्कला चालले होते[७] रशियाच्या आपत्कालीन प्रसंग मंत्रालयानुसार, विमानात ८९ प्रवासी ७ कर्मचारी होते. राष्ट्राध्यक्षांच्या सचिव झोफिया क्रुझिन्स्का-गुस्त ऐनवेळी बरे वाटत नसल्यामुळे विमानात चढल्या नव्हत्या.
अपघाताच्या वेळी विमानतळाच्या आसपास धुके होते व फक्त ५०० मीटरइतके लांबचेच दिसत होते. विमान धावपट्टीपासून ३०० ते ४०० मीटर दूर कोसळले.[८] यावेळी वैमानिक उतरण्याचा प्रयत्न रद्द करून विमान पुन्हा उंचीवर नेण्याच्या प्रयत्नात होते.[९] दाट धुक्यामुळे विमानतळ आधीच बंद करण्यात आला होता आणि ग्राउंड कंट्रोल(भू-नियंत्रण,थळ नियंत्रण)[मराठी शब्द सुचवा]ने वैमानिकांना स्मोलेन्स्कमध्ये न उतरता मॉस्को किंवा मिन्स्कला जाण्याचा सल्ला दिला. वैमानिकांनी हा सल्ला न जुमानता, विमान तेथेच उतरवण्याचा निर्णय घेतला. या आधी,तीन वेळा उतरण्याचा प्रयत्न करतांना, धावपट्टी शोधण्यात अपयश आल्याने वैमानिकांनी विमान परत वर नेले होते. चौथ्या वेळी अशाच प्रयत्नात विमान कोसळले.[१०][११]. सुरुवातीसच अपघाताचे कारण 'वैमानिकांची चूक' असल्याचे वाटल्याने गुन्हेअन्वेषक अधिकारी अपघातस्थळी रवाना करण्यात आले. [१२][१३][१४] पूर्वीच्या एका घटनेत,२००८मध्ये कझिन्स्की दक्षिण ओसेशियाला गेले असताना युद्धसदृश परिस्थितीत त्यांच्या वैमानिकाने त्ब्लिसीमध्ये विमान उतरवण्यास नकार दिला असता त्याला बडतर्फ करण्याची धमकी दिली गेली होती. .[१५]
सुरुवातीला मृतकांची संख्या वेगवेगळी सांगितली जात होती.[१६] स्मोलेन्स्कच्या राज्यपाल सर्गेई अँतुफियेवने पोलंडच्या राष्ट्राध्यक्ष व त्यांच्या पत्नीसह विमानातील कोणीच बचावले नसल्याचे सांगितले. अपघातस्थळावर विमानाचे तुकडे इतस्ततः विखुरलेले दिसत होते. अनेक भाग उलटेपालटे होऊन पडले होते.[७]
- ०५.२३ ग्रीप्रवे - वॉर्सोहून विमान निघाले.
- ०६.५६ ग्रीप्रवे - विमान स्मोलेन्स्कजवळ कोसळले.
- ०७.०० ग्रीप्रवेच्या सुमारास - पहिली अनधिकृत बातमी हाती आली.
- ०७.२६ ग्रीप्रवे - रशियाच्या परराष्ट्रमंत्रालयाने बातमी प्रसारित केली.
- ०७.३६ ग्रीप्रवे - घटनास्थळी बचावपथकाने आग विझवून मृतकांना विमानाच्या तुकड्यांतून बाहेर काढणे सुरू केले.
- ०७.४१ ग्रीप्रवे - रशियाच्या मंत्रालयाने ८७ व्यक्ती मृत्यू पावल्याचे जाहीर केले.
- ०७.४९ ग्रीप्रवे - पोलिश सरककारच्या माहिती केन्द्राने पंतप्रधान डोनाल्ड टस्क ग्डान्स्कहून वॉर्सोला रवाना झाल्याचे कळवले.
- ०७.५४ ग्रीप्रवे - स्मोलेन्स्कच्या राज्यपालाने अपघातात कोणीच वाचले नसल्याचे कळवले.
- ०८.०८ ग्रीप्रवे - रशियाच्या परराष्ट्रमंत्रालयाने बहुतेक कोणीच वाचले नसल्याचे जाहीर केले.
- ०८.०८ ग्रीप्रवे - रशियाच्या राष्ट्राध्यक्ष दमित्री मेद्वेदेवने पंतप्रधान व्लादिमिर पुतिनच्या नेतृत्वाखाली अन्वेषण समिती स्थापल्याचे जाहीर केले.
- ०८.२५ ग्रीप्रवे - पोलंडच्या स्येमच्या अध्यक्ष ब्रॉनिस्लॉ कोमोरोव्स्कीचे वॉर्सोत आगमन.
- ०८.३६ ग्रीप्रवे - रशियाच्या परराष्ट्रमंत्रालयाने लेक कझिन्स्कीचा मृत्यू गृहित धरले जात असल्याचे जाहीर केले.
- ०८.४१ ग्रीप्रवे - रशियाच्या अन्वेषण समितीने विमानात १३२ व्यक्ती असल्याचे सांगितले.
- ०८.५५ ग्रीप्रवे - रशियाच्या परराष्ट्रमंत्रालयाने कोणीच वाचले नसल्याचे अधिकृतरीत्या जाहीर केले.
- ०९.०६ ग्रीप्रवे - पोलंडच्या परराष्ट्रमंत्रालयाने कोणीच वाचले नसल्याचे अधिकृतरीत्या जाहीर केले.
अन्वेषण
संपादनअपघात झाल्यानंतर, काही तासांतच रशियाच्या राष्ट्राध्यक्ष दमित्री मेद्वेदेवनी यांनी पंतप्रधान व्लादिमिर पुतिनच्या नेतृत्वाखाली अन्वेषण समिती स्थापल्याची घोषणा केली.[१८][१९][२०] याशिवाय रशियाच्या मुख्य प्रॉसिक्यूटर(मुख्य सरकारी न्यायधीश)[मराठी शब्द सुचवा] यांनी सुरक्षा नियमांचा भंग झाल्याचा संशय व्यक्त करून त्याचा शोध घेण��यासाठी एक समिती नेमली.[२१]
सुरुवातीच्या अटकळी
संपादनविमानाचे वय आणि दुरुस्ती
संपादनहे विमान रशियातील समारा शहरातील क्विबिशेव एव्हियेशन प्लांट (क्र. १८) येथे जून २९, इ.स. १९९० रोजी तयार केले गेले होते. ९०A८३७ क्रमांक असलेले हे विमान पोलंडच्या वायुसेनेसाठी तयार केले गेले होते.[२२]
हवामान व वैमानिकांच्या चुकीबद्दलच्या बातम्यांच्या काही तासांतच बी.बी.सी. या वृत्तसंस्थेने अहवाल दिला की २० वर्षे जुन्या या विमानाबद्दल शंका व्यक्त केल्या जात आहेत. त्यानुसार २००८मध्ये कझिन्स्की याच विमानातून मंगोलियाच्या दौऱ्यावर असताना त्याच्या दिशाचालन यंत्रणेत बिघाड झाल्याने कझिन्स्कीला इतर खासगी विमानाने जपान गाठावे लागले होते. परंतु डिसेंबर २००९ मध्येच या विमानाची देखभाल झाली होती. हे देखभाल करणाऱ्या कारखान्याच्या मुख्याधिकाऱ्यानुसार, विमानात बिघाड होण्यास काही कारण नव्हते.[२३] या कारखान्याने, संबंधित विमानाची, पाच वर्षे किंवा ७,५०० उड्डाणतासांची हमी दिलेली होती. त्यानंतर फक्त १३८ तासच हे विमान हवेत होते.[२४] पॉल डफी या रशियाच्या विमानवाहतूकतज्ज्ञानुसार, आत्तापर्यंत टीयू १५४ प्रकारच्या २८ विमानांना अपघात झाले होते आणि त्यातील तांत्रिक बिघाडामुळे झालेले अपघात कमी होते. या प्रकारच्या विमानातील तंत्रज्ञान, विमानांचे वय व कामात असणारी विमाने बघता टीयू १५४ प्रकारचे विमान इतरांपेक्षा जास्त धोकादायक नाही.[२३]
वैमानिकांनी धुडकावलेला एर ट्राफिक कंट्रोलने(हवाई वाहतूक नियंत्रण कक्ष) दिलेला सल्ला
संपादनरॉयटर या वृत्तसंस्थेने दावा केला आहे की वैमानिकांनी एर ट्राफिक कंट्रोलच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले व विमान उतरवण्याचा प्रयत्न केला. स्वतःचे नाव न देता माहिती सांगणाऱ्या तळनियंत्रक अधिकाऱ्यानुसार ग्राउंड कंट्रोलने वैमानिकांना स्मोलेन्स्कमधील दाट धुक्यामुळे विमान मिन्स्क किंवा मॉस्कोला विमान नेण्यास सांगितले पण त्यांनी तरीही विमान स्मोलेन्स्कमध्येच उतरवण्याचे ठरवले. त्या धुक्यात कोणीही विमान उतरवायला नको होते.[२५]
रशियन वायुसेना अधिकारी अलेक्झांडर अलेशिनच्या म्हणण्यानुसार विमान धावपट्टीपासून अंदाजे दीड किमी लांब असताना त्याचा खाली उतरण्याचा वेग अचानक वाढला व विमान ग्लाइड स्लोप(तरंग उतरण)[मराठी शब्द सुचवा]च्या खाली गेले. तळनियंत्रकांनी वैमानिकाला विमान वर नेण्याचे व उतरण्याचा प्रयत्न रद्द करण्याचे आदेश दिले पण वैमानिकाने त्याकडे दुर्लक्ष करीत विमान उतरवण्याचा प्रयत्न चालू ठेवला. यावर नियंत्रकांनी वैमानिकाला विमान धावपट्टीवरील उतरण्याच्या दुय्यम बिंदूवर उतरवण्यास सांगितले. याकडेही दुर्लक्ष करीत विमान खाली येत राहिले व शेवटी झाडांवर आदळून कोसळले.[२६]
इन्स्ट्रूमेंट लँडिंग (उपकरणाधारित उतर-प्रणाली,उपकरणाधारित भूदाखल-प्रणाली)[मराठी शब्द सुचवा]प्रणालीचा अभाव
संपादनउत्तर स्मोलेन्स्क विमानतळ हा पूर्वीचा वायुसेनातळ होता व आता तो वायुसेना तसेच प्रवासी वाहतूक दोन्हीसाठी वापरला जातो. या विमानतळावर इन्स्ट्रूमेंट लँडिंग प्रणाली(उपकरणाधारित उतर-प्रणाली,उप���रणाधारित भूदाखल-प्रणाली) नाही.[२७] विमानतळावर अशी प्रणाली असली तर दाट धुक्यातही विमान उतरवणे अगदी सोपे होते. वायुसेनेची मालवाहू विमाने अशा प्रणालीशिवायही उतरू शकतात.
अधिकृत अन्वेषण
संपादन१० एप्रिलला ११:५३ वाजता रशियाच्या विमानवाहतूक अधिकारी सर्गेई शोयगूने विमानाचे ब्लॅक बॉक्स मिळाल्याचे जाहीर केले. दुसरे ब्लॅक बॉक्स अंदाजे पावणेचार वाजता सापडले.[२८]
राजकीय परिणाम
संपादनपोलंडच्या संविधानानुसार राष्ट्राध्यक्षांच्या मृत्यूपश्चात संसदेच्या कनिष्ठ गृहाचे (सेय्म) अध्यक्ष आपोआप राष्ट्राध्यक्षपदी आरूढ होतात. यानुसार ब्रॉनिस्लॉ कोमोरोव्स्की आता पोलंडचे हंगामी राष्ट्राध्यक्ष आहेत.[२९] संविधानाच्या १३१व्या कलमानुसार कोमोरोव्हस्कींनी राष्ट्राध्यक्षांच्या मृत्यूनंतर ६० दिवसांच्या आत निवडणुका घेण्याचे जाहीर केले. सप्टेंबर किंवा ऑक्टोबर २०१०मध्ये होणाऱ्या या निवडणुका आता त्या वर्षीच्या २० जूनच्या आत पार पाडल्या जातील.
पोलंडमधील प्रतिक्रिया
संपादनया अपघाताचे वृत्त ऐकून वॉर्सोमधील राष्ट्राध्यक्षीय महालाच्या बाहेर गर्दी जमली व त्यांनी तेथे शेकडो फुले, पुष्पगुच्छ आणि मेणबत्त्या ठेवल्या. वॉर्सोतील इतर भागात लोकांनी आपल्या खिडक्यांमध्ये काळ्या फिती लावून दुःख प्रकट केले. क्राकोवमध्ये बारा धर्मगुरूंनी तेथील झिगमुंट घंटा वाजवली. ही घंटा फक्त अतीव दुःखाच्या प्रसंगीच वाजवली जाते. हंगामी राष्ट्राध्यक्ष ब्रॉनिस्लॉ कोमोरोव्हस्कीने एक आठवड्याचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला.
भूतूपूर्व राष्ट्राध्यक्ष आलेक्सांदेर क्वाशन्येफस्कीने टी.व्ही.एन. २४ या वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत सांगितले की (स्मोलेन्स्क) ही एक शापित जागा आहे. त्याची आठवण काढता माझ्या अंगावर शहारा येतो. आधी तेथे पोलंडच्या दुसऱ्या प्रजासत्ताकाच्या फुलांचा (पोलिश सैनिक व अधिकारी) तेथे खून पडला व आता पोलंडच्या तिसऱ्या प्रजासत्ताकाच्या बुद्धिवाद्यांचा स्मोलेन्स्कला जात असतानाच बळी गेला.[३०]
पोलंडच्या पंतप्रधान डोनाल्ड टस्कच्या मते आधुनिक जगाने यासारखी शोकांतिका पाहिलेली नाही.[३१]
भूतपूर्व पोलिश पंतप्रधान लेझेक मिलरने पोलंडची सरकारी विमाने बदलण्याजोगी असल्याचे प्रतिपादन केले. मिलर पंतप्रधान असताना हेलिकॉप्टर अपघातात स्वतः जखमी झाला होता. मी पूर्वी म्हणाले होते की एके दिवशी आपण (पोलिश सरकारी अधिकाऱ्यांच्या) अंतिमयात्रेत भेटू आणि तेव्हाच आपण ही विमाने बदलण्याचा निर्णय घेऊ.[३२]
रशियामधील प्रतिक्रिया
संपादनरशियाच्या राष्ट्राध्यक्ष दमित्री मेद्वेदेव आणि पंतप्रधान व्लादिमिर पुतिननी पोलंडच्या हंगामी राष्ट्राध्यक्ष ब्रॉनिस्लॉ कोमोरोव्स्कीला आपले शोकसंदेश पाठवले.[३३] डुमाचे अध्यक्ष कॉन्स्तांतिन कोसाचेव याने म्हणले की केटिनने अजून काही बळी घेतले. डुमाच्या चेरमन(अध्यक्ष)[मराठी शब्द सुचवा] बोरिस ग्रिझलोवने शोक व्यक्त केला[३४] या घटनेमुळे एप्रिल १२, २०१० या दिवशी रशियात राष्ट्रीय शोक पाळला जाईल.
ख्यातनाम प्रवासी
संपादनविमानातील प्रवाशांच्या यादीनुसार विमानात राष्ट्राध्यक्ष कझिन्स्कीशिवाय पोलिश सैन्याचे मुख्याधिकारी (आरमार, वायुसेना, सैन्य), मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर, परराष्ट्रउपमंत्री, मुख्य सैनिकी धर्मगुरू, राष्ट्रीय सुरक्षा कार्यालयाचे मुख्याधिकारी, संसदेचे उपस्पीकर(उपवक्ते)[मराठी शब्द सुचवा], पोलंडच्या ऑलिंपिक समितीचे मुख्याधिकारी, नागरी हक्क मुख्याधिकारी आणि अनेक संसद सदस्य होते. याव्यतिरिक्त कझिन्स्कीची पत्नी मरिया कझिन्स्कीही या विमानात होती.[३५][३६][३७][३८]
आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया
संपादनजगातील बहुतेक राष्ट्रांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व खेद व्यक्त केला.
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ
संपादन- ^ a b "Названа предварительная версия крушения самолета президента Польши". Lenta.ru (Russian भाषेत). 2010-04-10. 2010-04-10 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "Президент Польши погиб в катастрофе Ту-154 – всего 97 жертв". Newsru.com (Russian भाषेत). 2010-04-10. 2010-04-10 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ http://www.aolnews.com/world/article/polish-president-lech-kaczynski-was-killed-in-a-plane-crash-in-russia/19434298
- ^ "Polish president killed in plane crash". CNN. 2010-04-10. 2010-04-10 रोजी पाहिले.
- ^ "Accident description". Aviation Safety Network. 2010-04-10. 2014-10-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-04-10 रोजी पाहिले.
- ^ "'Great tragedy' decimates Poland's leadership". MSNBC. 2010-04-10. 2010-04-10 रोजी पाहिले.
- ^ a b c "Polish President Lech Kaczynski dies in plane crash". BBC. 2010-04-10. 2010-04-10 रोजी पाहिले.
- ^ "Polish president killed in air crash near Russia's Smolensk". RT. 2010-04-10. 2010-04-12 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2010-04-10 रोजी पाहिले.
- ^ "Polish president feared dead in Russian plane crash". 10 April 2010. 10 April 2010 रोजी पाहिले.
- ^ "Polish president Lech Kaczynski killed in plane crash". The Guardian. 10 April 2010 रोजी पाहिले.
- ^ "Polish President Killed in Plane Crash". 10 April 2010 रोजी पाहिले.
- ^ "Pilot error may have caused Polish crash". China Daily. 10 April 2010 रोजी पाहिले.
- ^ "Human error caused crash of Polish president's airplane in Russia". 2012-11-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 April 2010 रोजी पाहिले.
- ^ "Thick fog led to the plane crash – The Investigative Committee". The Voice of Russia. 2010-04-10. 2010-04-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-04-10 रोजी पाहिले.
- ^ "Пилот отказался сажать в Тбилиси самолет с президентами (Pilot refused to land aircraft with presidents in Tbilisi)" (Russian भाषेत). 10 April 2010 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ White, Gregory (2010-04-10). "Polish President, Others Killed in Plane Crash". The Wall Street Journal. 2010-04-10 रोजी पाहिले.
- ^ टी.व्ही.एन. २४ वृत्तवाहिनी
- ^ "Президент России". 10 April 2010 रोजी पाहिले.
- ^ "Президент России". 10 April 2010 रोजी पाहिले.
- ^ "Расследование обстоятельств гибели президента Польши поручили Путину". 10 April 2010 रोजी पाहिले.
- ^ "По факту катастрофы Ту-154 возбуждено уголовное дело" (Russian भाषेत). 10 April 2010 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ Nine151, Peter. Soviet Transports. West Drayton, Middlesex, United Kingdom. pp. 570, 589.
- ^ a b "Crash focusses attention on Tupolev-154". BBC. 2010-04-10. 2010-04-10 रोजी पाहिले.
- ^ "Katastrofa Tu-154M pod Smoleńskiem". Altair (Polish भाषेत). 2010-04-10. 2010-04-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-04-10 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "Polish president, top officials killed in plane crash". Reuters Online. 2010-04-10. 2010-04-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-04-10 रोजी पाहिले.
- ^ Экипаж разбившегося под Смоленском самолета не выполнил указаний руководителя полетов аэродрома «Смоленск» INTERFAX, 10 April 2010.
- ^ "ZDF spezial: Polnischer Präsident stirbt bei Flugzeugabsturz" (जर्मन भाषेत). 2010-04-10.
- ^ News24.vom: "'Black boxes' of Lech Kaczynski's plane found " Archived 2010-04-13 at the Wayback Machine., 10 April 2010
- ^ "The Constitution of the Republic of Poland". 10 April 2010 रोजी पाहिले. Article 131
- ^ "President of Poland Killed in Plane Crash in Russia". The New York Times. 10 April 2010. 10 April 2010 रोजी पाहिले.
- ^ Agata Kondzińska. "Nadzwyczajne posiedzenie rządu: – Takiego dramatu świat nie widział". 2010-04-10 रोजी पाहिले.
- ^ Kulish, Nicholas. "Polish President Dies in Jet Crash in Russia". 2010-04-10 रोजी पाहिले.
- ^ "Russian leaders express condolences over tragic death of Polish president". 10 April 2010 रोजी पाहिले.
- ^ "Глава международного комитета Госдумы: "Катынь забрала новые жертвы"" (Russian भाषेत). 10 April 2010 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "Polish leader, 96 others dead in Russia jet crash - Yahoo! News". 2010-04-15 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2010-04-10 रोजी पाहिले.
- ^ "Prezydenckim Tu-154 leciały najważniejsze osoby w państwie" (Polish भाषेत). 10 April 2010 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "Polish president's plane crashes in Russia: ministry". 2010-04-13 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 10 April 2010 रोजी पाहिले.
- ^ "Full list of the passengers and the crew". 2010-04-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 April 2010 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
संपादन- Full list of the passengers and the crew published on the Official Polish Presidential website Archived 2010-04-13 at the Wayback Machine. (पोलिश)
- List of updated news (रशियन)
- List of crash victims Archived 2011-05-14 at the Wayback Machine. (पोलिश)
- List of crash victims Archived 2010-04-12 at the Wayback Machine. (इंग्रजी)