सिक्कीम

भारत देशातील राज्य
(सिक्किम या पानावरून पुनर्निर्देशित)

सिक्कीम हे भारतातील देशाच्या ईशान्य भागातील एक राज्य आहे.[] हिमालय पर्वतरांगेमध्ये वसलेल्या सिक्कीमच्या दक्षिणेला भारताचे पश्चिम बंगाल हे राज्य, पूर्वेस भूतान, पश्चिमेस नेपाळ तर उत्तरेस चीन देशाचा तिबेट स्वायत्त प्रदेश आहेत. आकाराने गोव्याखालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात लहान राज्य असलेले सिक्कीम येथील निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. कांचनगंगा हे जगातील तिसरे सर्वात उंच पर्वतशिखर सिक्कीम व नेपाळच्या सीमेवर आहे.

सिक्कीम
भारताच्या नकाशावर सिक्कीमचे स्थान.
भारताच्या नकाशावर सिक्कीमचे स्थान.
भारताच्या नकाशावर सिक्कीमचे स्थान
देश भारत ध्वज भारत
स्थापना १६ मे १९७५
राजधानी गंगटोक27°20′N 88°37′E / 27.33°N 88.62°E / 27.33; 88.62
सर्वात मोठे शहर गंगटोक
जिल्हे
लोकसभा मतदारसंघ
क्षेत्रफळ ७,०९६ चौ. किमी (२,७४० चौ. मैल) (२७)
लोकसंख्या (२०११)
 - घनता
६,१०,५५७ (२८)
 - ७६.१७ /चौ. किमी (१९७.३ /चौ. मैल)
प्रमाणवेळ भारतीय प्रमाण वेळ (यूटीसी+०५:३०)
प्रशासन
 - राज्यपाल
 - मुख्यमंत्री
 - विधीमंडळ (जागा)
 - उच्च न्यायालय

गंगा प्रसाद
प्रेम सिंह तमांग
विधानसभा (३२)
सिक्कीम उच्च न्यायालय
राज्यभाषा नेपाळी
आय.एस.ओ. कोड IN-SK
संकेतस्थळ: sikkim.nic.in/

सिक्कीममधील बहुसंख्य जनता नेपाळी वंशाची असून बौद्ध हा येथील प्रमुख धर्म आहे.

प्रास्ताविक

संपादन
 
गुरू रिनपोचे यांची ३५ मी. उंच मूर्ती सिक्किम

एकीकडे कांचनगंगासारखी बर्फाच्छादित हिमशिखरे आणि दुसरीकडे वसंतात डोळ्यांचे पारणे फेडायला लावणारी फुलणारी विविध प्रकारची फुले अशा दोन्ही टोकाच्या गोष्टी सिक्कीममध्ये आहेत. नेपाल, तिबेट, भूतान आणि बंगाल असे चारही दिशांनी बंदिस्त असे सिक्कीम हे हिमालयाच्या कुशीत असलेले एक छोटे राज्य आहे.

इतिहास

संपादन
 
सोरेंग गावातील वृद्ध महिला

सिक्कीममध्ये सतराव्या शतकापर्यंत नामग्याल राजघराण्याची एकसत्ताक पद्धत रूढ होती. राजा तेन सिंग न्यामग्याल ने युकसोम येथून राजधानी हलवून रबदानसे येथे नेली. पण नेपाळ व भूतान यांच्याकडून सतत होणाऱ्या स्वाऱ्यांनी या छोट्या राज्याची व रहिवाश्यांची वाताहत झाली. ब्रिटिश काळात सिक्कीमचे तत्कालीन हिंदुस्थानच्या मदतीने नेपाळशी युद्ध झाले. त्या वेळी सिक्कीमने ब्रिटिश इंडिया व नेपाळशी अनुक्रमे सुगोली, तितालिया करार करून हस्तगत केलेला भाग परत मिळवला. भारताचा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९७४ पर्यंत सिक्कीम भारताचे संरक्षित क्षेत्र बनले. सिक्कीमच्या संरक्षण, परराष्ट्र आणि दळणवळणाची जबाबदारी सरकारने स्वीकारली. भारताबरोबर घनिष्ठ संबंध असावेत अशी इच्छा सिक्कीमने व्यक्त केली. त्यानुसार सिक्कीमला सहयोगी राज्य घोषित करण्यात आले. यामुळेही सिक्कीमच्या आकांक्षा पूर्ण झाल्या नाहीत. म्हणून १९७५ मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधींच्या राजवटीत सार्वमत घेऊन सिक्कीम भारतीय संघराज्यात सामील झाले व ते भारताचे एक राज्य म्हणून गणले जाऊ लागले. सिक्कीम हे तीन दिशांनी वेगवेगळ्या सीमांनी बंदिस्त असल्याने संरक्षणदृष्ट्या अतिसंवेदनशील आहे, त्यामुळे भारतीय लष्कराचे तेथे वर्चस्व आहे.

भूगोल

संपादन

डोंगराळ भाग असल्याने सतत दरड कोसळणे, पावसाने रस्ते वाहून जाणे, भूकंप वगैरे आपत्तींना सिक्कीम येथील रहिवाशांना सामोरे जावे लागते. त्यातून मार्ग काढणे हे येरागबाळ्याचे काम नव्हे. त्यासाठी सिक्कीममध्ये भारताच्या सैन्याची शाखा, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन आहे. तेथील सर्व रस्त्यांची व्यवस्था पाहणे हे त्यांचेच काम. डोंगराळ भागामुळे सिक्कीममध्ये रेल्वेची सोय होणे दुरापास्त आहे.

सिक्कीमला जाणे

संपादन

राजधानी गंगटोक येथे बागडोगराहून कारने किंवा हेलिकॉप्टरने जाता येते, पण हेलिकॉप्टरची सेवा दिवसातून एकदाच असते. शिवाय एका वेळेला फक्त चारच माणसे जाऊ शकतात. त्यामुळे प्रायव्हेट टॅक्सीज, बसेस यांची भरपूर वर्दळ असते. कोलकाता येथून सिलिगुडी किंवा जलपायगुडीपर्यंत रेल्वेने जाता येते. पुढे बस किंवा टॅक्सीने सिक्कीमला पोहोचता येते. मोठ्या अवजड वाहनांना, आणि दुसऱ्या राज्यातील टूरिस्ट वाहनांना सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत गंगटोकमधे अजिबात प्रवेश नसतो.

सिक्कीमच्या पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण भागातली अनुक्रमे गंगटोक, ग्यालशिंग, मंगन, नामची ही प्रमुख शहरे आहेत. गंगटोक ही राजधानी असल्याने ते शहर प्रमुख कचेऱ्या, शाळा, कॉलेजेस, इत्यादींमुळे जास्त वहिवाटीचे व दाटीवाटीचे आहे. डोंगराळ भागामुळे रस्ते खूपच अरुंद आणि चढ-उताराचे, त्यामुळे वाहतूकीचे नियम अगदी कडक आहेत, ते कसोशीने पाळले जातात.

उत्तर तिबेटमधील तिबेटी, शिवाय नेपाळी लोक फार पूर्वीपासून सिक्कीममध्ये वास्तव्य करून आहेत. इंग्लिश, हिंदी, लेपचा, लिंबू नेपाळी, भूतिया या भाषा प्रामुख्याने व्यवहारात वापरल्या जातात. व्यापाराची बहुतेक धुरा आपल्याकडील मारवाडी लोकांनी सांभाळली आहे. सिक्कीममध्ये प्रामुख्याने हिंदू व बौद्ध धर्माचे लोक आहेत. ख्रिश्चन धर्मीय फारच थोड्या प्रमाणात आहेत. रुमटेक ही सर्वात जुनी मॉनेस्ट्री आहे. नव्या रुमटेकला सोन्याचा स्तूप आहे. पश्चिमेस रुमटेकप्रमाणे पेमियांगत्से मोनेस्ट्री त्याच काळातली आहे. येथे झाडाच्या ढोलीतून कोरलेले धम्मचक्र नक्कीच पाहण्यासारखे आहे. लहान मुले लामा होण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी मोनेस्ट्रीमध्येच राहतात.

प्रेक्षणीय स्थळे

संपादन

कांचनगंगा

संपादन

ज्याला आपण कांचनगंगा म्हणून ओळखतो ते जगप्रसिद्ध कांग चेन जुंगा हे हिमशिखर सिक्कीमच्या पश्चिम भागात आहे.[] ८४५० मी. उंचीचे हे शिखर जगातील तिसऱ्या क्रमांकाचे शिखर आहे. तिथले रहिवासी कांचनगंगाला सोने, चांदी, विविध रत्‍ने, शिवाय धान्य, पवित्र ग्रंथ यांचा खजिना असल्यासारखे पवित्र मानतात. येथे गिर्यारोहणाची क्वचितच परवानगी दिली जाते. गंगटोक येथून कांचनगंगाचे छानपैकी दर्शन होते, पण ती अवाढव्य बर्फाची भिंतच वाटते.

पश्चिमेस पेलिंग गावापासून कांचनगंगा अवघ्या ५० किमी. अंतरावर असल्याने आपल्याला संपूर्ण पर्वताचे दर्शन दिवसभर होते. जवळ जाऊन पाहिल्यास शिखरापर्यंत नजर ठरूच शकत नाही. सकाळी सूर्योदयाच्या वेळेस बर्फाच्छादित पर्वतावर पडणारी कोवळी किरणे कांचनगंगा हे नाव सार्थ ठरवतात. दिवसभर आपल्याला कांचनगंगाचे सौंदर्य वेगवेगळ्या अंगाने अनुभवता येते. सूर्योदयावेळी कोवळ्या किरणांमुळे वेगळीच सोनेरी छटा संपूर्ण डोंगरच सोन्याचा करते, तर दुपारी धारदार तलवारीप्रमाणे संपूर्ण डोंगर चमकत असतो आणि रात्री लखलखत्या ताऱ्यांच्या मंद प्रकाशात पांढऱ्याशुभ्र क्षीरसागरासारखा दिसतो. असे हे वेगवेगळे रूप दिवसभर पाहत राहिलो तरी मनाचे समाधान होत नाही. थोड्या उंच जागेवरून कांचनगंगाच्या आसपास असणारी काब्रू, सिमवो, कुंभकर्ण, पांडीम अशी काही शिखरेही नजरेस पडतात.

मार्तम

संपादन

पेलिंगपासून गंगटोकला जाताना वाटेत मार्तम हे छोटेसे गाव लागते. युनेस्कोने हे गाव दत्तक घेतले आहे. डोंगराळ भागामुळे उंच-सखल जमिनीवर टेरेस फार्मिंगची प्रथा आहे. गाईड आपल्याला संध्याकाळच्या वेळेस गावात फेरफटका मारण्यासाठी घेऊन जातात. येथे काही ठराविक घरांमध्ये हेरिटेज म्हणून अजूनही पूर्वीचीच मांडणी असल्याचे दिसून येते. बटाटा, विविध प्रकारचे बांबू आणि आल्याच्या शेतीतून फिरताना बऱ्ऱ्याच औषधी वनस्पतींचीही लागवड केलेली दिसते. गाीड आपल्याला त्याबद्दल माहिती करून देतात. वेलदोड्याच्या लागवडीसाठी सिक्कीम फार प्रसिद्ध आहे.
पुढे उत्तरेकडे चुंगथान येथे रस्त्याचे दोन फाटे फुटतात. एक लाचेन येथे तर दुसरा लाचुंगला जातो. लाचेन येथूनच तिस्ता नदीचा उगम होतो.

दोंगमार आणि लातुंग

संपादन

लाचेन येथे गुरू दोंगमार हे सरोवर आहे. कडक थंडीतही सरोवराचा विशिष्ट भाग मुळीच गोठत नाही. १२००० फूट उंचीवर हिमशिखरांनी वेढलेले आणि रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या रंगीबेरंगी ऱ्होडोडेंड्राॅन व पांढरे मॅग्नोलिया (कवठी चाफा) यामुळे लातुंग हे नेहमीच नटलेले असते. तेथूनच पुढे युमथान, ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ येथे जाता येते.
सिक्कीमच्या भौगोलिक स्थानामुळे उंचावर पांडा, जंगली मांजर, याक असे प्राणी, तर रॉबिन, फ्लाय कॅचर, सँडपायपर असे पक्षी दिसतात. झाडांच्या बाबत पाईन, जुनिपर, फर, सायप्रस वगैरे झाडे आढळतात. ऱ्होडोडेंड्राॅन हा ‘राज्यवृक्ष’ मानला जातो.

वनस्पती

संपादन
 
सिक्कीम मधील प्रेक्षणीय निसर्गदृश्य

कॉटन ट्री, वेलची, विविध बांबू, बटाटे आलं यांच्या लागवडीबरोबर रंगीबेरंगी ऑर्किस्, गुलाब, झेंडू, हिरव्यागार भाज्यांचे मळे इथे पाहायला मिळतात.ौ येथील तपमान २८ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त किंवा शून्य अंश सेल्सिअसच्या खाली उतरत नसल्याने हवा नेहमीच छान, त्यामुळे फळफळावळ, फुलांना तोटा नाही. दरवर्षी गंगटोक येथे ऑर्किडच्या फुलांचे प्रदर्शन भरते. परदेशाप्रमाणे आपल्याकडेही एवढ्या प्रकाराची ऑर्किड असतात याची सामान्यलोकांना कल्पना नसते. फळा-फुलांप्रमाणेच इथले लोक तब्येतीने चांगले दिसतात. तिस्ता नदी म्हणजे सिक्कीमची जीवनवाहिनी मानली जाते. डोंगराळ भागातल्या लहान लहान उपनद्या मिळून ‘रंगीत’ नदी बनते व तिस्तामध्ये सामावते.

सिक्कीममध्ये दसरा, दिवाळीसारखे हिंदू सण, तर तिबेटियन लोसार, लुसांग शिवाय फेब्रुवारीत येणारे नवीन वर्ष जोमाने साजरे केले जाते. त्यादिवशी तिबेटी लोक रंगीत पोषाखात ‘ताशी डिलेक’ अशी आरोळी देत याक डान्स करतात. कांचनगंगाचीही पूजा केली जाते.[] जसे वेगवेगळे सण तसेच वेगवेगळ्या खाद्यपदार्थासाठीदेखील सिक्कीम प्रसिद्ध आहे. तेथे मोमो, थेंटुक, ठुपकाशिवाय विविध लोणची, मासे यांची वेगळी चव असते. खास त्या भागातील जंगलात मिळणारे विशिष्ट प्रकारच्या फर्नचे कोवळे कोंब ‘फिड्ल ह���डेड फर्न’ची याकचे चीज घालून केलेली भाजी अतिशय चवदार असते.

क्रीडा

संपादन

सिक्कीममध्ये रिव्हर राफ्टिंग, ट्रेकिंग, रॅपलिंग अशा वेगवेगळ्या क्रीडाप्रकारांचा अनुभव घेता येतो.

चित्रदालन

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ Subba, J. R. (2008). History, Culture and Customs of Sikkim (इंग्रजी भाषेत). Gyan Publishing House. ISBN 978-81-212-0964-9.
  2. ^ "Tourists flock to Panchagarh to have a glimpse Kangchenjunga". The Business Standard (इंग्रजी भाषेत). 2021-11-13. 2021-11-13 रोजी पाहिले.
  3. ^ "5 Reasons Why Sikkim is the Perfect Melting Pot of Cultures". https://www.outlookindia.com/outlooktraveller/ (इंग्रजी भाषेत). 2021-11-13 रोजी पाहिले. External link in |website= (सहाय्य)