राष्ट्रीय महामार्ग ५
उत्तर भारतातील एक राष्ट्रीय महामार्ग
राष्ट्रीय महामार्ग ५ (जुने क्रमांकन) याच्याशी गल्लत करू नका.
राष्ट्रीय महामार्ग ५ (National Highway 5) हा भारताच्या पंजाब, चंदीगढ व हिमाचल प्रदेश ह्या राज्यांमधून धावणारा एक राष्ट्रीय महामार्ग आहे. हा महामार्ग पंजाबमधील भारत-पाकिस्तान सीमारेषेवरील फिरोजपूर ह्या गावामध्ये सुरू होतो व पूर्व व ईशान्य दिशांना ६६० किमी धावून भारत-चीन आंतरराष्ट्रीय सीमेवरील शिपकी ला ह्या तिबेटजवळील घाटामध्ये संपतो. हा महामार्ग मोगा, जगराव, लुधियाना, मोहाली, चंदीगढ, पंचकुला, कालका, सोलन, सिमला, ठियोग, नारकंडा, कुमारसेन व रामपूर ह्या नगरांमधून धावतो. हिमाचल प्रदेशातील बराचसा भाग सतलज नदीच्या जवळून काढण्यात आला आहे.
राष्ट्रीय महामार्ग ५ | |
---|---|
राष्ट्रीय महामार्ग ५ चे नकाशावरील स्थान | |
मार्ग वर्णन | |
देश | भारत |
लांबी | ६६० किलोमीटर (४१० मैल) |
देखरेख | भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण |
सुरुवात | फिरोजपूर, पंजाब |
शेवट | शिपकी ला, हिमाचल प्रदेश |
स्थान | |
राज्ये | पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, चंदीगढ |
जुळणारे प्रमुख महामार्ग
संपादन- तलवंडी भाई - राष्ट्रीय महामार्ग ५४
- दोराहा - राष्ट्रीय महामार्ग ४४