राळेगाव विधानसभा मतदारसंघ
राळेगांव विधानसभा मतदारसंघ - ७७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, राळेगाव मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील १. बाभुळगाव, २. कळंब आणि ३. राळेगाव ही तालुके आणि ४. केळापूर तालुक्यातील रुंझा महसूल मंडळ यांचा समावेश होतो. राळेगाव हा विधानसभा मतदारसंघ यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमाती - ST च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[१][२]
भारतीय जनता पक्षाचे अशोक रामाजी उईके हे राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती
संपादनराळेगाव विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :
- बाभुळगाव तालुका
- कळंब तालुका
- राळेगाव तालुका
- केळापूर तालुका : रुंझा महसूल मंडळ
राळेगाव मतदारसंघातून निवडून आलेले आमदार
संपादननिवडणूक निकाल
संपादनमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९ | ||
---|---|---|
राळेगांव | ||
उमेदवार | पक्ष | मत |
प्रो. वसंत चिंधुजी पुरके | काँग्रेस | ७४,६२२ |
अशोक रामाजी वूकी | अपक्ष | ३४,२०४ |
बाबासाहेब जंगलाजी कांगले | भाजप | ३२,६४१ |
सुधाकर बहेरू चांदेकर | बसपा | ५,४१८ |
ज्ञानेश्वर तथा लहानू दमडू मारसखोले | अपक्ष | १,७६७ |
अशोक दत्तूजी मेश्राम | अपक्ष | १,६६० |
गजानन महादेवराव श्रीरामे | अपक्ष | १,६३६ |
विलास कवडुजी कन्नके | अपक्ष | ९७८ |
हरीदास साधुजी मेश्राम | अपक्ष | ९६७ |
RAMAJI GANGARAM AATRAM | अपक्ष | ८८३ |
RAMDAS GOVINDA AATRAM | अपक्ष | ७२५ |
CHHABUTAI NILKANTHA TEKAM | अपक्ष | ५३९ |
CHANDRABHAN DASARU UDE | अपक्ष | ५०२ |
NETAJI SITARAMJI KINAKE | अपक्ष | ४५० |
NAMDEO ALIAS NARAYAN YASHWANT MADAVI | अपक्ष | ३४५ |
बाह्य दुवे
संपादन- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर राळेगाव विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २२ जुलै २०१३ रोजी पाहिले.
- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).