मार्च ३१
दिनांक
<< | मार्च २०२५ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
मार्च ३१ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ९० वा किंवा लीप वर्षात ९१ वा दिवस असतो.
ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये ३१ मार्च हा वर्षाचा ९० व्या दिवस आहे (लीप वर्षात ९१ अंशांचा). वर्ष संपेपर्यंत २७५ दिवस बाकी असतात. रविवार किंवा सोमवार (५७) पेक्षा मंगळवार, गुरुवार किंवा शनिवार (प्रत्येकी ४०० वर्षांमध्ये प्रत्येक ५८ वर्षांत) पडण्याची शक्यता अधिक आहे, आणि बुधवार किंवा शुक्रवार (५६) रोजी होण्याची शक्यता कमी आहे.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनएकोणिसावे शतक
संपादन- १८६७ - प्रार्थना समाजची स्थापना.
विसावे शतक
संपादन- १९२७ - डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोश हा महाप्रचंड ज्ञानकोश प्रकल्प पूर्ण केला.
- १९९७ - भारतीय शास्त्रज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर आणि चेक शास्त्रज्ञ डॉ. निरी ग्रायगर यांना विज्ञान लोकप्रिय करण्याच्या कार्याबद्दल युनेस्कोतर्फे दिला जाणारा कलिंग पुरस्कार प्रदान.
एकविसावे शतक
संपादन- २००१ - भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर याने एकदिवसीय क्रिकेट प्रकारामध्ये १०,००० धावा पूर्ण केल्या.
जन्म
संपादन- १८४३ - बळवंत पांडुरंग किर्लोस्कर, मराठी रंगभूमीचे जनक.
- १८६५ - आनंदीबाई गोपाळराव जोशी, पहिल्या भारतीय महिला वैद्यकीय चिकित्सक.
- १९०६ - जनरल के. एस. थिमय्या, भारतीय सरसेनापती.
मृत्यू
संपादन- १७२७ - सर आयझेक न्यूटन, इंग्लिश शास्त्रज्ञ व तत्त्वज्ञानी.
- १९२६ - दत्तात्रय बळवंत पारसनीस, इतिहास संशोधक.
- १९४५ - फ्रेडरिक बर्गियस, जर्मन रसायनशास्त्रज्ञ, नोबेल पुरस्कार विजेता.
- १९७२ - मीनाकुमारी, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
- २००० - डॉ. हरदेव बहारी, हिंदी लेखक आणि शब्दकोशकार.
- २००४ - गुरूचरणसिंग तोहरा, अकाली दलाचे नेते आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष.
- २००४ - गणपतराव वडणगेकर गुरुजी, कोल्हापूरचे चित्रकार,कलादिग्दर्शक.
प्रतिवार्षिक पालन
संपादन- मुक्ती दिन - माल्टा.
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर मार्च ३१ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
मार्च २९ - मार्च ३० - मार्च ३१ - एप्रिल १ - एप्रिल २ - (मार्च महिना)