फेब्रुवारी १७
दिनांक
<< | फेब्रुवारी २०२५ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ |
फेब्रुवारी १७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ४८ वा किंवा लीप वर्षात ४८ वा दिवस असतो.
ठळक घटना
संपादनसतरावे शतक
संपादन- १६७० - शिवाजी महाराजांनी मुघलांकडून सिंहगड किल्ला जिंकला.
- १६९८ - औरंगजेबाने जिंजी किल्यावर कब्जा केला.
एकोणिसावे शतक
संपादन- १८०१ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत दोन उमेदवार थॉमस जेफरसन व एरन बर यांना सारखी मते मिळाली. हाउस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह्सनी जेफरसनला राष्ट्राध्यक्ष तर बरला उपाध्यक्ष केले.
- १८६४ - अमेरिकन यादवी युद्ध - दक्षिणेच्या सी.एस.एस. हनलीने उत्तरेचे यु.एस.एस. हुसाटॉनिक हे जहाज बुडवले.
- १८६५ - अमेरिकन यादवी - दक्षिणेच्या सैन्याने कोलंबिया, दक्षिण कॅरोलिनातुन पळ काढला. जाताना शहरास आग लावली.
- १८६७ - सुएझ कालव्यातून पहिले जहाज पार झाले.
- १८८२ - सिडनी क्रिकेट मैदानावर पहिला क्रिकेट कसोटी सामना खेळला गेला.
विसावे शतक
संपादन- १९२७ - वीर वामनराव जोशी द्वारा लिखित रणदुंदुभी नाटकाचा प्रयोग मुंबईमध्ये झाला, त्यामध्ये दीनानाथ मंगेशकरांनी तेजस्विनीची भूमिका केली.
- १९३३ - अमेरिकेतील न्यूझवीक हे नियकालिक पहिल्यांदा प्रकाशित झाले.
- १९३३ - अमेरिकेत दारूबंदी समाप्त.
- १९५७ - अमेरिकेत वॉरेंटन, मिसुरी येथील वृद्धाश्रमात आग. ७२ ठार.
- १९५८ - पोप पायस बाराव्याने असिसीच्या संत क्लेरला दूरदर्शक संचाचा रक्षक संत जाहीर केले.
- १९५९ - हवामानाचा अभ्यास करण्यासाठीचा पहिला उपग्रह व्हॅंगार्ड दोन प्रक्षेपित करण्यात आला.
- १९६२ - जर्मनीत हांबुर्ग येथे हिमवादळ. ३०० ठार.
- १९६४ - अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की अमेरिकन कॉॅंग्रेसचे सगळे मतदारसंघ सारख्या लोकसंख्येचेच पाहिजेत.
- १९७४ - रॉबर्ट के. प्रेस्टन या अमेरिकन सैनिकाने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानात(व्हाइट हाउस) हेलिकॉप्टर उतरवले.
- १९७९ - चीन व व्हियेतनाममध्ये युद्ध सुरू.
- १९९५ - संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीनंतर पेरू व इक्वेडोरने युद्धसंधि केला.
- १९९६ - महासंगणक डीप ब्ल्यू बुद्धिबळात गॅरी कास्पारोव्हकडून पराभूत.
- १९९७ - नवाझ शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान झाले.
एकविसावे शतक
संपादन- २००२ - दहशतवाद्यांनी जम्मूच्या राजौरी जिल्ह्यात नरला गावात एकाच परिवाराच्या ८ लोकांची हत्या केली.
- २००२ - नेपाळमध्ये माओवादींच्या मोठ्या हल्ल्यात सेना व पोलिसांच्या १२९ जवानांसहित १३८ लोकांची हत्या, प्रत्युत्तर कार्यवाहीमध्ये १०० हुन अधिक विद्रोही मारले.
- २००४ - फूलनदेवी हत्याकांडाचा मुख्य मुख्य आरोपी शमशेर सिंह राणा तिहाड़ जेलमधून फरार
- २००५ - बांगलादेशची लेखिका तसलीमा नसरीनने भारतीय नागरिकतेचि मागणी केली
- २००६ - फिलिपाईन्सच्या दक्षिण लेयटे भागातील सेंट बर्नार्ड गावावर दरड कोसळून १,००पेक्षा अधिक व्यक्ती ठार.
जन्म
संपादन- १८१७ - विल्यम तिसरा, नेदरलॅंड्सचा राजा.
- १८९९ - जीवनानंद दास, बंगाली साहित्यिक.
- १९५४ - के. चंद्रशेखर राव, तेलंगणाचे पहिले मुख्यमंत्री.
मृत्यू
संपादन- ३६४ - जोव्हियन, रोमन सम्राट.
- १८८३ - वासुदेव बळवंत फडके, भारतीय क्रांतिकारी.
- १९१९ - विल्फ्रिड लॉरिये, कॅनडाचा पंतप्रधान.
- १९३४ - आल्बर्ट पहिला, बेल्जियमचा राजा.
- १९६८ - कैलाश नाथ काटजू, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री.
- १९८६ - जिद्दू कृष्णमूर्ति, भारतीय दार्शनिक.
- १९८८ - कर्पूरी ठाकुर, बिहारचे मुख्यमंत्री.
- १९९४ - चिमनभाई पटेल, गुजरातचे मुख्यमंत्री.
- २००५ - पंडित सीताराम चतुर्वेदी, हिंदी साहित्यिक आणि पत्रकार.
- २०१७ - वेद प्रकाश शर्मा, हिंदी लेखक.
प्रतिवार्षिक पालन
संपादन- उत्पादकता सप्ताह
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर फेब्रुवारी १७ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
फेब्रुवारी १५ - फेब्रुवारी १६ - फेब्रुवारी १७ - फेब्रुवारी १८ - फेब्रुवारी १९ - (फेब्रुवारी महिना)