दांडा
दांडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातल्या पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातले गाव आहे.हे गाव उत्तर कोकणात मोडते.
?दांडा महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | पालघर |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• ४०११०२ • +०२५२५ • महा ४८ |
नाव
संपादनदांडा हे नाव गावाच्या उजव्या बाजूकडून वाहणाऱ्या आणि अरबी समुद्रास मिळणाऱ्या दांडा खाडी वरून पडले आहे.
लोकजीवन
संपादनयेथे मुख्यतः मुस्लिम, भंडारी, मांंगेले समाजातील लोक पिढ्यानपिढ्या राहतात. खरीप हंगामातील भातशेती बरोबरच रब्बी हंगामात फुलभाज्या, फळभाज्या, पालेभाज्या पिकविल्या जातात. दांडाखाडी गावाला लागूनच असल्याने खाडी तसेच समुद्रातील मासेमारी हा येथील बारमाही व्यवसाय आहे.मासेमारीसाठी छोट्या होड्या येथेच बांधल्या जातात.ताजे मासेविक्री केळवे, मधुकरनगर, चटाळे, एडवण तसेच सफाळे ह्या ठिकाणी केली जाते. उरलेले मासे समुद्र किनाऱ्यावर सुकविले जातात. सुके मासे पालघर जिल्ह्याच्या ठिकाणी शुक्रवारच्या आठवडा बाजारात विकले जातात.कोलीम मासा हा कोलीम लोणचे व कोलीम चटणी बनविण्यासाठी वापरला जातो.
नागरी सुविधा
संपादनग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक स्वच्छता, दिवाबत्ती, पावसाळ्यातील पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारबांधणी, सार्वजनिक पाणी पुरवठा इत्यादी कामे केली जातात. येथे येण्यासाठी सफाळे रेल्वे स्थानकाजवळ एसटी बस, तसेच अॉटोरिक्षा मिळतात. पालघर, केळवे, माहीम, शिरगाव, सातपाटी येथेही रिक्षा असतात. गावात प्राथमिक शिक्षणाची सोय आहे. माध्यमिक शिक्षणासाठी केळवे, आगरवाडी, एडवण अथवा सफाळे गावात जावे लागते. उच्च माध्यमिक शिक्षण, कोर्ट, हॉस्पिटल, इत्यादी सुविधा पालघर जिल्ह्याच्या ठिकाणीच उपलब्ध आहेत.
संदर्भ
संपादनhttps://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
२. http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc