जागतिक प्राणी दिवस
सर्व सृष्टीवर प्रेम करा’ हे भारतीय संस्कृतीमध्ये अनेक प्रकारे सांगितले आहे. जगात अनेक ठिकाणी प्राणिमात्रांना क्रूरपणे वागवले जाते किंवा त्यांच्याकडे दुर्लक्षच केले जाते. वाढत्या लोकसंख्येमुळे पूर्वीची घनदाट जंगल तुटून तिथे गावाची नगरे व नगरांची महानगरे होत असताना भरपूर प्रमाणात जंग�� तोड झाली त्यामुळे प्राण्यांचे अस्तित्त्व धोक्यात आले आहे. काही पाळीव प्राण्यांना अतिशय चांगले वागवले जाते तर काहींना दिवसभरात खायलाही मिळत नाही. ही समस्या जगापुढे आणण्यासाठी जगभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. लहान- मोठ्या, पाळीव- भटक्या अशा सर्व प्राणिमात्रांचा यांमध्ये समावेश होतो.
पर्यावरणासोबतच प्राण्यांचेही संरक्षण व्हावे यासाठी १९३१ मध्ये इटली देशातील फ्लाॅरेन्स शहरात एक पर्यावरण परिषद भरवण्यात आली होती. या परिषदेत लोकांमध्ये प्राण्यांविषयी संवेदनशीलता आणि आपुलकीची भावना जागृत व्हावी यासाठी ४ ऑक्टोबर हा दिवस 'जागतिक प्राणी दिन' म्हणून पाळला जावा, असे ठरवण्यात आले. तेव्हापासून हा दिवस 'जागतिक प्राणी दिवस' म्हणून ओळखला जातो.