जमखंडी
जमखंडी (कन्नड -: ಜಮಖಂಡಿ; मराठी - जमखिंडी) हे भारताच्या कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल्ह्यातले (पूर्वी विजापूर जिल्ह्यातले) एक शहर आहे. जमखंडी हे पटवर्धनांचे जमखंडी म्हणून ओळखले जाते. जमखंडीप्रमाणेच सांगली, मिरज आणि कुरुंदवाड ही गावेही पटवर्धनांचीच. या जमखिंडी तालुक्यात ६४ खेडी समाविष्ट आहेत.
शिक्षण
संपादनजमखिंडीत शकुंतला गर्ल स्कूल (मुलींची प्राथमिक शाळा), फेरी स्कूल आणि पागा शाळा अशा तीन प्राथमिक शाळा आहेत. पागा शाळेत पूर्वी घोड्यांची पागा होती, म्हणून ते नाव. माध्यमिक शिक्षणासाठी प.भा (परशुरामभाऊ) हे एकच विद्यालय आहे. विद्यार्थ्यांना कॉलेजचे शिक्षण मोफत मिळावे म्हणून जमखंडीच्या सर परशुरामभाऊ पटवर्धनांनी पुण्याच्या न्य़ू पूना कॉलेजला मोठी देणगी दिली. तेव्हापासून ते कॉलेज सर परशुरामभाऊ कॉलेज (एस.पी. महाविद्यालय]] म्हणून ओळखले जाऊ लागले. जमखंडीचे रहिवासी असलेल्या आणि जमखंडीमधून शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एस.पी. कॉलेजमध्ये मोफत शिक्षण मिळू शकते.
प्रेक्षणीय स्थळे
संपादनजमखंडीपासून दीड-दोन मैलांवर रामतीर्थ नावाचे क्षेत्र आहे. तेथे श्रावणातल्या चारही सोमवारी यात्रा भरते. वरच्या भागाला ’रामचंद्र प्रासाद’ म्हणून संस्थानिकांची वास्तू आहे. गावापासून चार मैलाच्या अंतरावर डोंगराच्या पायथ्याशी केल्हळी नावाचे क्षेत्र आहे. तेथे व्यंकटेशाचे आणि गोविंदराजचे अशी प्रसिद्ध देवालये आहेत. या गोविंदराजने कुबेराला कर्ज दिले होते. परत घेताना गोविंदराज थकून झोपी गेले. त्याच्या उशाशी पैसे मोजण्याचे माप आहे.
जमखंडी क्षेत्रातली पिके
संपादनया भागातली मुख्य पिके म्हणजे ज्वारी, कृष्णाकाठची वांगी, करडई तेल व शेंगादाणा होत. या भागात पावसाचे प्रमाण फार थोडे आहे. जमखंडीचे तूप उत्तम समजले जाते.
यात्रा
संपादनगुढी पाडव्यापासून पुढे पाच दिवस जमखंडी गावात गुरांची मोठी यात्रा भरते. यावेळी बैलगाड्यांच्या शर्यती असत व एकाच बैलाची ताकद अजमावण्यासाठी लोखंडाच्या भल्यामोठ्या कायलीत रेतीची पोती भरून ती कायली बैलांकडून ओढायची शर्यत असे. त्याच वेळी कुस्त्या, वजन उचलणे अशा शर्यती होत. जिथे या शर्यती असत त्याला पोलो ग्राउंड असे नाव आहे. कदाचित तेथे पूर्वी घोड्यावरून पोलो खेळला जात असावा.
अन्य
संपादनजमखंडीच्या अनेक मुली पुण्यात दिल्या आहेत. काही पुण्याच्या मुलीही लग्न करून जमखंडीत येतात.
जमखंडीतील बालबा चोपडे यांचा पेढा व चिवडा काही पिढ्यांपासून प्रसिद्ध आहे.
वट्टतात (=एकूण) आणि मनगंड (=भरपूर) हे शब्द कानावर पडले तर ते बोलणारी माणसे जमखंडीची समजावीत.
जमखंडी संस्थान
संपादनसरदार वल्लभभाई पटेल यांनी संस्थाने विलीन करायचे ठरविल्यानंतर सर्वात प्रथम आपले संस्थान विलीन करण्याचा निर्णय पटवर्धनांनी घेतला.
जमखंडी सिल्क
संपादनप्रसिद���ध व्यक्ति
संपादन- मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब गंगाधर खेर
- भारताचे राष्ट्रपती बी.डी. जत्ती
- दानशूर संस्थानिक परशुरामभाऊ पटवर्धन
- गुरुदेव रामभाऊ दत्तात्रेय रानडे
- विठ्ठल रामजी शिंदे