छत्रपती शाहू महाराज टर्मिनस
महाराष्ट्राच्या कोल्हापूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक
छत्रपती शाहू महाराज टर्मिनस हे महाराष्ट्राच्या कोल्हापूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. मिरज-कोल्हापूर रेल्वेमार्ग येथे संपतो. कोल्हापुरातून मुंबई, पुणे,मिरज,सांगली,नागपूर इत्यादी शहरांकडे गाड्या सुटतात. मिरज-कुर्डुवाडी मार्गाचे रुंदीकरण पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूरपासून सोलापूर व हैदराबाद पर्यंत रेल्वेप्रवास शक्य झाला आहे.
छत्रपती शाहू महाराज टर्मिनस मध्य रेल्वे स्थानक | |
---|---|
स्थानक तपशील | |
पत्ता | कोल्हापूर, कोल्हापूर जिल्हा |
गुणक | 16°42′9″N 74°14′16″E / 16.70250°N 74.23778°E |
मार्ग | मिरज-कोल्हापूर |
फलाट | 4 |
इतर माहिती | |
विद्युतीकरण | 2020 मध्ये कोल्हापूर ते मिरज विद्युतीकरण झाले |
संकेत | KOP |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | मध्य रेल्वे |
स्थान | |
|
कोल्हापूरचे मराठा सम्राट छत्रपती शाहूराजे भोसले ह्यांच्या नावावरून ह्या रेल्वे स्थानकाचे नाव दिले गेले आहे. भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे विभागाद्वारे ह्या स्थानकाचे नियंत्रण केले जाते.
प्रमुख रेल्वेगाड्या
संपादन- मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस
- मुंबई-कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस
- मुंबई-कोल्हापूर कोयना एक्सप्रेस
- कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस
- कोल्हापूर-तिरुपती हरीप्रिया एक्सप्रेस
- कोल्हापूर-सोलापूर एक्सप्रेस
- कोल्हापूर-हैदराबाद एक्सप्रेस
- कोल्हापूर-धनबाद दीक्षाभूमी एक्सप्रेस