समाजवादाचा उदय
स्वातंत्र्य व समता यावर आधारलेला समाज कसा अस्तित्वात येईल याविषयी एक संगतवार मांडणी कार्ल मार्क्सने केली आहे. काहीजण तिला 'शास्त्रीय समाजवादाचा सिद्धान्त ' असे म्हणतात. आर्थिक विषमतेचे व कामगारांच्या शोषणाचे खरे कारण शोधून काढण्यासाठी मार्क्सने धर्म, तत्त्वज्ञान, इतिहास, भौतिकशास्त्रे यांचा सखोल अभ्यास केला. १८४८ मध्ये मार्क्स व एंगल्स यांनी ' कम्युनिस्ट मॅनिफॅस्टो ' हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यात भांडवलशाहीप्रधान व्यवस्था कशी बदलायची व शोषणरहित समाज कसा निर्माण करायचा याविषयी त्याने निश्चित भूमिका मांडली.
अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या मार्क्सने पाच अवस्था सांगितल्या. प्राथमिक साम्यवाद, गुलामगिरीवर आधारलेली अर्थव्यवस्था, सरंजामशाही, भांडवलशाही व समाजवाद या पाच अवस्था होत. शेवटच्या समाजवादाच्या अवस्थेत कामगारवर्ग संघटितपणे उठाव करून शासनसंस्था ताब्यात घेतो. उत्पादनाची साधने समाजाच्या मालकीची होतात. यामुळे कोणी कोणाची पिळवणूक करू शकत नाही. यामुळे कोणी कोणाविरुद्ध उठाव करणार नाही. अशा प्रकारच्या वर्गविहीन , शोषणविरहित समाज अस्तित्वात आल्यावर सर्व लोक सुखाने नांदतील. मार्क्सच्या मते ' कष्टकऱ्यांची गरिबी ' देवनिर्मिती नाही तर ती मानवनिर्मिती आहे व ती संघटितपणे बदलणे शक्य आहे.
मार्क्सच्या या विचारांचा स्वीकार सर्वात प्रथम रशियाने केला. नंतर चीनने. इ,स, १९१७ च्या साम्यवादी क्रांतीनंतर रशियात साम्यवादी सरकार सत्तेवर आले. नंतर चीनने इ.स. १९२५ मध्ये शेतकऱ्यांच्या मदतीने साम्यवादी क्रांती घडवून आणली. काही आग्नेय आशियायी देशांनीही साम्यवादाचा स्वीकार केला. २० व्या शतकाच्या सुरुवातीस संपूर्ण जगभर मार्क्सच्या विचारांचे वादळ होते. दरम्यानच्या कालावधीत भारत हा पारतंत्र्यातून मुक्त होण्यासाठी धडपडत असताना भारतातील काही नेते या साम्यवादी विचारांनी भारावून गेले. त्यावरही मार्क्सच्या विचारांचा पगडा बसला. त्यांनीही मार्क्सवाद स्वीकारला पण ज्याप्रमाणे चीनने, रशियाच्या धर्तीवर मार्क्सवाद जशास तसा न स्वीकारता त्यात थोडा फार बदल करून कामगाराबरोबरच क्रांतीत, शेतकऱ्यांचाही सहभाग घेऊन क्रांती यशस्वी केली. तद्वतच भारतातील काही नेत्यांनी राष्ट्रवादातून साम्यवाद स्वीकारला व नवीन लोकशाही समाजवादाचा स्वीकार केला.
भारतातले समाजवादावर आधारित राजकीय पक्ष
संपादन- कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया
- मार्क्सवादी कम्यनिस्ट पक्ष
- समाजवादी पक्ष : या पक्षाची अनेक छकले झाली आणि होत आहेत.